नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या योजनांची माहिती.
budget 2024 अर्थसंकल्पात निर्मला सीतारमन यांनी केली घोषणा आता लक्ष तीन कोटी लखपती दीदीचे आहे.
👇👇अशाच नवनवीन बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत वाचण्यासाठी आमच्या शेतकरी ग्रुपमध्ये सामील व्हा👆👆
अर्थमंत्री म्हणाल्या आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा चार घटकांवर आम्ही विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
या अंतर्गत एका योजनेची माहिती देत, सीतारमण यांनी ‘लखपती दीदी’ चा उल्लेख केला.
१ फेब्रुवारी २०२४ ला सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात लखपती दीदी योजनेचा आवाका दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्यात आला आहे.
या योजनेच्या पूर्वीच्या यशाबाबत अर्थमंत्र्यांनी सांगितले की, “आतापर्यंत ९ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला आहे.
लखपती दीदींमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत.
अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जात आहे.
आतापर्यंत एक कोटी महिलांना लखपती दीदी करण्यात आले आहे”.
पण नेमकी ही लखपती दीदी योजना आहे काय? त्याचा लाभ कसा घ्यावा हे सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पहा.
हा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी लखपती दीदी योजनेचा उल्लेख केला, त्यानंतर या योजनेकडे देशभरातील लोकांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा 👇👇
👉हे आहेत फायदे लखपती दीदी योजनेचे पहा सविस्तर येथे 👈
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचा उपक्रम सुरू केला होता,
ज्याअंतर्गत 15 ऑगस्ट 2023 रोजी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लखपती दीदी योजनेचा उल्लेख केला होता.
लखपती दीदी योजनेतून महिलांना काय लाभ मिळत आहेत?
या योजनेंतर्गत देशातील महिला आर्थिकदृष्ट्या साक्षर होतील.
या योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी कार्यशाळा घेण्यात येणार असून त्यामध्ये त्यांना अर्थविषयक माहिती दिली जाणार आहे.
या योजनेचा उद्देश महिलांना सक्षम करणे हा आहे.
या कार्यशाळांमध्ये अर्थसंकल्प, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक साधने समजून घेणे यासारख्या विषयांचा समावेश आहे.
लखपती दीदी योजनेंतर्गत, महिलांना नियमित बचत करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते.
हे ही वाचा 👇👇
👉EVM निर्मिती कंपनी भारत सरकारची सदस्य भाजपचे👈
लखपती दीदी योजनेअंतर्गत महिलांना उद्योजकता उद्योग, शिक्षण किंवा इतर गरजांसाठी छोटी कर्जे दिली जातात.
या योजनेअंतर्गत महिलांना डिजिटल बँकिंग सेवा, मोबाईल वॉलेट आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म कसे वापरायचे हे शिकण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
आर्थिक लाभांव्यतिरिक्त, योजना विविध सक्षमीकरण कार्यक्रमांद्वारे महिलांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान निर्माण करण्यावर देखील लक्ष केंद्रित करते.
एकूणच, या महिलांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर सकारात्मक परिणाम व्हावा, हा या योजनेमागचा विचार आहे.