Onion industry कांदा हा शेतकऱ्यांना हमेशाच रडवतो आणि व्यापाऱ्यांना हसवतो करा असा कांद्याचा उद्योग जो कधीच देणार नाही तोटा.

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतातील सर्व राज्यात किंवा घेतले जाणारे पीक या पिकामुळे शेतकऱ्यांच्याही व ग्राहकाच्या डोळ्याला पाणी येते असे हे पीक आहे.

पण एक असा वर्ग आहे ज्या वर्गाला या पिकापासून कधीच डोळ्याला पाणी येत नाही तो म्हणजे व्यापारी वर्ग..

यामुळेच जर आपण कांदा उत्पादक असाल किंवा बेरोजगार असाल तर हा कांद्यापासून तयार होणारा पदार्थ बनवून आपण महिन्याला लाखो रुपयाची कमाई करू शकता.

👇👇अशाच नवनवीन बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत वाचण्यासाठी आमच्या मराठी बातमी ग्रुपमध्ये सामील व्हा 👆👆

 कांदा हे कापूस ऊस यानंतरचे भारतातील ‘नगदी पीक’ म्हणून ओळखले जाते,

कांदा पिके कोणत्याही हंगामात घेतले जाते खरीप व रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे, कांदा हा नाशवंत असून,

कांद्यामध्ये बरेच आयुर्वेदिक  गुणधर्म देखील असतात उदाहरणार्थ मोतीबिंदू, कर्करोग, मूत्रक्षय,हृदयातील  रक्तवाहिन्या शरीरातील उष्णता संदर्भातील आजारांवरही अत्यंत गुणकारी ठरते.

Onion industry कांदा हा शेतकऱ्यांना हमेशाच रडवतो आणि व्यापाऱ्यांना हसवतो करा असा कांद्याचा उद्योग जो कधीच देणार नाही तोटा.

कांदा उद्योग प्रक्रियेमुळे होणारे फायदे :

कांदा नाशवंत असल्यामुळे, बहुतांशी शेतकऱ्यांची कांदा खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होते, परंतु कांदा प्रक्रियेमुळे हे नुकसान टाळता येऊ शकते.

हे ही वाचा 👇👇

👉होळीसाठी या रेशनकार्डवर मोफत साडी वाटणार शिंदे सरकार १.२८ लाख कुटुंबांना फायदा👈

कांदा पेस्ट करून बाजारांमध्ये विकणे :

सध्याची जीवनशैली बदलत चालली आहे, बहुतेक लोक आता कामाला आळशी झाले आहेत त्यांना सर्वकाही आयते लागते.

शहरातल्या महिला जॉबवर जात असल्याकारणाने, बाजारात तयार केलेली कांदा पेस्टला मागणीदेखील राहते.

याकरिता कापलेले कांदे तेलामध्ये तळून घेतले जातात.

नंतर मिक्‍सरमधून काढून त्यांची पेस्ट केली जाते.

कांदा पेस्ट  केल्यामुळे कांद्याची साठवणक्षमता वाढते.

कांद्यावर प्रक्रिया करून वाइन / सॉस हे पदार्थ बनवणे:

कांद्यामध्ये साखर आणि इतर पोषक पदार्थ जास्त असतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रक्रिया करून व्हिनेगर सॉस आणि वाइन आदींची निर्मिती करता येते.

कांदे पासून पावडर तयार करणे :

कांद्यावर योग्य प्रक्रिया केल्यास, कांद्याची आर्द्रता कमी होवून त्यापासून कांदा पावडर तयार केली जाते, कांदा पावडर निर्यात केल्यास मोठी संधी आहे. योग्य पॅकेजिंग तंत्रज्ञान वापरणे अत्यावश्‍यकता असते.

हे पण वाचा 👇👇

👉कमी पाण्यात कमी डिटर्जंट कमी वेळेत आरामात घासा भांडे👈

कांद्याचे लोणचे करून बाजारपेठेत विक्री / किंवा त्याची निर्यात करणे :

व्हिनेगर किंवा तेलाचा वापर करून कांद्याचे लोणचे तयार करता येते. अमेरिका आणि युरोप बाजारपेठेमध्ये व्हिनेगर वापरून, तर आशिया-आफ्रिका बाजारपेठेमध्ये तेल वापरून बनवलेले कांद्याचे लोणचे लोकप्रिय आहे. याद्वारे देखील आपणास मोठी संधी मिळू शकेल. तसेच कांदा पडून राहून खराब होण्यापेक्षा, त्यावर प्रक्रिया करून उद्योग करणे केव्हाही चांगले.

कांद्यापासून तेल निर्मिती करणे :

कांद्यापासून तेलसुद्धा तयार करता येते. प्रक्रियाकृत उत्पादनांमध्ये कांद्याचा स्वाद आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या तेलाचा वापर होतो.