नमस्कार आज आपण पाहणार आहोत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट 2024 मध्ये महिलांसाठी विशेष तरतूद केली आहे.
budget 2024 अर्थसंकल्पात निर्मला सीतारमन यांनी केली घोषणा आता लक्ष तीन कोटी लखपती दीदीचे या योजनेसाठी यांनी विशेष तरतूद केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अंतरिम अर्थसंकल्प २०२४ चे भाषण हे भारताच्या अर्थमंत्र्यांच्या सर्वात कमी वेळेतील भाषणांपैकी एक होते,
परंतु या कमी वेळेतील भाषणात त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.
सीतारमण यांनी म्हटले की, “आम्ही गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी अशा चार घटकांवर आम्ही विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
या अंतर्गत महिलांचा विकास साधण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे.
१ फेब्रुवारी २०२४ ला सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पात लखपती दीदी योजनेचा आवाका दोन कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढवण्यात आला आहे.
या योजनेच्या पूर्वीच्या यशाबाबत अर्थमंत्र्यांनी सांगितले की, “आतापर्यंत ९ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झाला आहे.
लखपती दीदींमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत.
आणि आता देशातील अजुन तीन कोटी महिलांना लखपती बनवणार आहे.
असे अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्या कार्यकाळातील शेवटचे बजेट सादर करताना सांगितले.
लखपती दीदी योजना
लखपती दीदी योजना ही मोदी सरकारची महिलांसाठी राबवण्यात आलेली खास योजना येयात महिलांना बिझनेस प्लान, मार्केटिंगबाबत ट्रेनिंग दिले जाते. या योजनेत महिलांना कमी खर्चात आरोग्य विमादेखील दिला जातो. लखपती दीदी योजना मायक्रोक्रेडिट सुविधा देतात. ज्यात महिलांना बिझनेस, शिक्षण आणि स्मॉल लोन मिळते.
लखपती दीदी योजनेत हे लाभ दिले जातात
आर्थिक साक्षरता वर्कशॉप (Finanacial Literacy Wirkshop)
सेव्हिंग इन्सेंटिव्ह (Saving Incentives)
मायक्रोक्रेडिट सुविधा (MicroCredit Benefits)
स्किल डेव्हलपमेंट आणि वोकेशनल ट्रेनिंग (Skill Devlopment And Vocational Trainig)
व्यावसायिक प्रशिक्षण (Enterprenurship Supprt)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला संबंधित राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे. महिला बचत गटात सदस्य असणे बंधनकारक आहे.